पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २० फेब्रवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते उधमपूर जिल्ह्यातील एका रॅलीला संबोधित करणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी ३,१६१ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उदघाटन जम्मू-काश्मीरमध्ये करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी ड्रोन उडवण्यास, लाईट एअरक्राफ्टवर बंदी घातली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी कलम १४४ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद मोदींच्या दौऱ्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दले योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहेत.
दहशतवादी व देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी व दौऱ्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दौऱ्यावेळी हवाई निगराणी देखील केली जाणार आहे. संरक्षण व निमलष्करी दलांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २० तारखेला जम्मूमध्ये ३,१६१ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. जम्मू येथील मौलाना आझाद स्टेडियम येथील सभेला ते संबोधित करणार आहेत. मोदींच्या दौऱ्यावपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी मोदी ज्या ज्या ठिकाण जाणार आहे त्या ठिकाणची तपासणी करण्यात आली आहे.