सिंह हा प्राणी जंगलाचा राजा असतो. मात्र याचा जंगलाच्या राजाच्या नावावरून एक वाद निर्माण झाला आहे. तर हा वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. कोलकत्ता येथील बंगाली सफारी पार्कमध्ये सिंह आणि सिंहीणीची जोडी आणण्यात आली आहे. त्रिपुरा राज्यातील प्राणिसंग्रहालयातून या जोडीला कोणता येथील बंगाली सफारी पार्कमध्ये आणण्यात आले आहे. मात्र या सिंह आणि सिहिणीच्या नावामुळे एक वाद निर्माण झाला आहे. सिंहाचे नाव अकबर तर सिंहीणीचे नाव हे सीता असल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेने या सीता या नावावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
बंगाली सफारी पार्कमध्ये आणण्यात आलेल्या सीता या सिंहीणीचे नाव बदलण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्रिपुरातून ही जोडी बंगालमध्ये आणण्यात आल्यावर यांची नावे बदलण्यात आली असे विहिंपचे म्हणणे आहे. या राज्यात दुर्गापूजेसाठी उच्च न्यायालयात जावे लागते. त्यामुळे सिंह आणि सिंहीणीचे नाव बदलण्याचा प्रकार कोणी केला असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी विहिंपची मागणी आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल मधील युनिटने ही याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सिंहीणीचे नाव अशा प्रकारे ठेवल्याने समाजच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. तसेच कोणत्याही प्राण्याला देवीदेवतांची नावे दिली जाऊ नयेत अशी मागणी देखील विश्व हिंदू परिषदेने या याचिकेतून केल्याचे समजते आहे. मात्र अशी नावे देण्यात आली असून, अद्याप त्यांचे अधिकृत नामकरण झाले नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.