जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे दुःखद निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. रात्री २ वाजून ३५ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. छत्तीसगड येथील डोंगरगड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय ७७ वर्षे इतके होते. कर्नाटक राज्यात संत आचार्य विद्यासागर महाराज यांचा जन्म झाला होता.
दिगंबर जैन आचार्य विद्यासागर हे दार्शनिक साधू होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली होती. मात्र त्यांनी आपला अधिक काळ बुंदेलखंड येथे वास्तव्य केले. छत्तीसगडच्या डोंगरगड येथे आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देहत्याग केला आहे. आचार्य विद्यासागर महाराज यांनी गेल्या तीन दिवसांपासून अन्न-पाण्याचा त्याग केला होता.
https://twitter.com/narendramodi/status/1759082122105786719
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिगंबर जैन आचार्य विद्यासागर महाराज यांना आदरांजली वाहिली आहे. पुढील पिढ्यांसाठी आचार्य विद्यासागर महाराज यांनी केलेले कार्य कायमच लक्षात राहील. लोकांमध्ये श्रद्धाभाव निर्माण करण्यासाठी ते ओळखले जात. डोंगरगड येथे गेल्या वर्षी मी त्यांची भेट घेतली होती. त्यांची भेट विसरता येणे कठीण आहे. मी त्यांना आदरांजली वाहतो. अशा आशयाची पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.