भारतीय लष्कराबाबत एक महत्वाची बातमी समोर येतेय. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. भारतीय लष्कराचे नवे उप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिल्लीमधील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली व त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला. लेफ्टनंतर जनरल उपेंद्र द्विवेदी हे मध्यप्रदेशमधील रिवा सैनिकी शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. १५ डिसेंबर १९८४ मध्ये त्यांची नियुक्ती जेएके आरआयएफमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी काश्मीर घाटी आणि राजस्थानच्या वाळवंटात देखील काम केले. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी इन्स्पेक्टर जनरल आसाम रायफल्स आणि सेक्टर कमांडर आसाम रायफल्सच्या महत्वाच्या पदांवर देखील काम केले आहे. तसेच त्यांनी प्रमुख दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला आहे.