नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा दिल्लीत भीषण अपघात झाला आहे. राजधानी दिल्लीमधील बी. डी. मार्गावर खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात फारच भीषण असल्याचे कळत आहे. मात्र या अपघातामधून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात कशामुळे झाले हे मात्र अजून समोर आलेले नाही आहे.
खासदार हेमंत गोडसे हे दिल्लीत जाताना बी.डी. मार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. हा अपघात इतका मोठा होता की, त्यांच्या वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सुदैवाने हेमंत गोडसे यांना दुखापत झालेली नाही. हेमंत गोडसे यांच्यसह गाडीत असणारे सहकारी देखील सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.
आज राज्यसभरात शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीतही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्याच कार्यक्रमाला हेमंत गोडसे जात होते का? याबद्दल अजून माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र बी.डी. मार्गावरून जात असताना खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला मागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याचे समजते आहे. सुदैवाने या अपघातामध्ये हेमंत गोडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही आहे. तसेच त्यांचे गाडीतील इतर सहकारी देखील सुखरूप असल्याचे समजते आहे.