आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रेचे नेतृत्व करीत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. देशांमधील अनेक राज्यामधून या यात्रेचा प्रवास सुरु आहे. मात्र २०१८ मधील एका केस प्रकरणी राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
सुलतानपूर कोर्टाने २०१८ मध्ये राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. २०१८ मध्ये राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये अमित शाह यांच्याविरुद्ध एक वक्तव्य केलं होते. त्या वक्तव्याविरुद्ध सुलतानपूर मधील भाजपच्या नेत्यांनी राहुल यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणात राहुल गांधी यांना आज न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे काही तासांसाठी भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांना स्थगित करावी लागणार आहे.
या वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी एनडीए सरकारने आणि ‘इंडिया’ आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. राहुल गांधी यांनी मागच्या वेळेस भारत जोडो यात्रा काढली होती. तर आता ते भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत. इंफाळपासून सुरु झालेली यात्रा ही, महाराष्ट्रात येऊन थांबणार आहे. भाजपाचे सरकार सत्तेत येऊन नये म्हणून इंडिया आघाडी जोरदार तयारी करताना दिसून येत आहे, मात्र आघाडीतील सोडून जाणाऱ्या पक्षांमुळे आघाडी कमकुवत तर होणार नाही ना याची काळजी विरोधकांना घ्यावी लागणार आहे.