जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये सोमवारी रात्री 9.35 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. . या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी होती. अचानक आलेल्या या भूकंपामुळे कडाक्याच्या थंडीतही नागरिक घराबाहेर निघाले होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस 148 किलोमीटर अंतरावर होता. तर भूकंपाची खोली भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खाली होती.
जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू आहे. नागरिक आपल्या घरतात असतांना रात्री 9.35 वाजेच्या सुमारास जमिनीला मोठे हादरे बसू लागले. अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिक घाबरले. बाहेर थंडी असतांना देखील नागरिक घराबाहेर पळत सुटले. श्रीनगरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजी काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. भूकंपकाकावर याची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी होती. गेल्या 13 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात 3.4 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू जमिनीत 5 किमी खोलीवर होता.