पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या निरंतर प्रगती, शांतता आणि समृद्धीसाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले आहेत की , ‘मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. मिझोरामच्या अनोख्या सांस्कृतिक वैविध्याचा तिथल्या समृद्ध सौंदर्याचा आणि तेथील लोकांच्या अगत्यशील व्यवहाराचा भारताला अभिमान आहे. मिझो संस्कृती अतिशय प्रेरणादायी आहे, जी परंपरा आणि सुसंवाद यांचे मिश्रण आहे. मी नेहमीच मिझोरामच्या निरंतर प्रगती, तिथल्या शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करत राहीन.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले आहेत की , अरुणाचल प्रदेशच्या राज्य स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला माझ्या शुभेच्छा. अरुणाचल प्रदेशातील लोक भारताच्या विकासात मोठे योगदान देत आहेत. या राज्याच्या संस्कृतीचेही विशेषत: दोलायमान आदिवासी परंपरा आणि समृद्ध जैवविविधतेचे नेहमीच कौतुक केले जाते. पुढील वर्षांत अरुणाचल प्रदेश समृद्ध राहावा हीच सदिच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स वरील पोस्ट |
https://twitter.com/narendramodi/status/1759799129004531791 |
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत मिझोराम आणि अरुणाचलच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.