भारताने आपल्या क्षमतेचा वापर करून सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. आता देशाने स्वतःवरील निद्रीस्त राक्षस हा ठसा पुसुन टाकल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) दिल्लीत आयोजित पदवीदान समारंभात उपराष्ट्रपती बोलत होते. याप्रसंगी इग्नूचे कुलगुरु प्रो. नागेश्वर राव, प्र-कुलगुरू प्रो. उमा कांजीलाल आणि प्रो.सत्यकाम प्रामुख्याने उपस्थित होते.
देशातील पोषक परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित करत उपराष्ट्रपतींनी त्यांना आवाहन केले, या असामान्य चालनेचा लाभ घ्या, पारदर्शकतेचा उपयोग करा, आर्थिक भरभराटीचा फायदा करून घ्या आणि संधींचे वैयक्तिक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये रूपांतर करा असे धनखड म्हणाले.नवी दिल्लीत झालेली जी-20 शिखर परिषद म्हणजे भारताच्या नेतृत्वाचा दाखला असल्याचा संदर्भ देत, उपराष्ट्रपतींनी नमूद केले की भारताच्या समावेशकता आणि सहभागाप्रति बांधिलकीचा सूर कशा प्रकारे जगभरात घुमत आहे . सातत्याने बदलत राहणाऱ्या तंत्रज्ञानात नवे कल येत राहतात आणि त्यांचा सर्वात जास्त प्रभाव असलेल्या जगात त्यांचा प्रवेश होत आहे याची आठवण करून देत उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना भारत@2047 चे खरे पाईक होण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्याचे आवाहन केले.