राष्ट्राय स्वाहा संस्थेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे, दि. १९ फेब्रुवारी : आयुर्वेदात सांगितल्यानुसार भारतीय वेळेनुसार लवकर झोपून लवकर उठणे हे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे. स्वास्थ्य व्यवस्थित असावे यासाठी वेळेचे व कामाचे योग्य नियोजन आवश्यक आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे विशेष निमंत्रित सदस्य प्रा. डॉ. प्रशांत साठे यांनी केले. राष्ट्राय स्वाहा या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज व रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आयुर्वेद आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रा. साठे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
शनिवार पेठेतील भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत या शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास ६८ नागरिक उपस्थित होते. त्यापैकी ३७ नागरिकांनी वैद्यकीय तपासणी करून घेत उपक्रमाचा लाभ घेतला. याप्रसंगी उद्दघाटक मा प्रा.डॉ.प्रशांत साठे, वैद्य केतन देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.
या आरोग्य शिबिरासाठी वैद्य धनंजय इंचेकर, वैद्य राधिका मराठे, वैद्य वैष्णवी कुलकर्णी, वैद्य शुभम गाडेकर, वैद्य हितेंद्र गवांडे, वैद्य अनिकेत खैरे यांनी आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तर मुकुंद तापकीर, सुधीर करंदीकर, प्रतिभा करंदीकर, प्रशांत तपस्वी, मोहन बागमार, भाजप नेते सुनील देवधर, अनिता तलाठी, भाजपचे माजी नगरसेवक जयंत भावे, भाजप नेते जगन्नाथ कुलकर्णी, गिरीष खत्री, अमोल डांगे, अमित झागडे यांच्यासह अनेकांनी शिबिरामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.