सध्या राज्यात काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर कॉँग्रेसने मुंबईत युवक कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटविले आहे. कॉँग्रेसने आमदार झिशान सिद्दीकी यांना मुंबई कॉँग्रेसच्या युवक अध्यक्षपदावरून हटविले आहे. रात्री उशिरा याबाबतचे परिपत्रक काढून झिशान सिद्दीकी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांना मोठा धक्का बसला आहे.
परिपत्रक काढून कॉँग्रेसने झिशान सिद्दीकी यांची उचलबांगडी केली आहे. त्यानंतर अखिलेश यादव यांच्या नावाची नवीन मुंबई कॉँग्रेस युवक अध्यक्ष म्हणून
घोषणा करण्यात आली आहे. तर युवक कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. दिल्ली, गोवा, अंदमान, निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.
कधी दिवसांपूर्वीच झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी कॉँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तेव्हापासून झिशान सिद्दीकी हे देखील कॉँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये कॉँग्रेसच्या काही बैठकींना माहिती समोर आली आहे. आता कॉँग्रेसने केलेल्या फेरबदलांमुळे झिशान सिद्दीकी देखील काही मोठा निर्णय घेतात का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.