पंतप्रधान नरेंद्र मोदी काल जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ३२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शिक्षण, रेल्वे, विमान वाहतूक आणि रस्ते क्षेत्रासह अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. पंतप्रधान कार्यालयाच्या मते, हे प्रकल्प आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, पेट्रोलियम आणि नागरी पायाभूत सुविधांसह अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत. यावेळी नागरिकांना संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबाबत भाष्य देखील केले आहे.
जम्मू येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. मात्र २०१९ मध्ये केंद्र सरकारने हरविलेल्या आर्टिकल ३७० बद्दल देखील भाष्य केले. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी हा निर्णय महत्वाचा होता, असे ते म्हणाले. तसेच बोलताना त्यांनी आता आर्टिकल ३७० वर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे ते म्हणाले. मला हा चित्रपट कसा आहे ते माहिती नाही पण याबद्दल मी टीव्हीवर पाहिले. आता तुमचा जयजयकार होणार असून, लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आर्टिकल ३७० या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम ही मुख्य भूमिकेत असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधानांनी चित्रपटाचा उल्लेख केल्याने यामी गौतम हीने नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
कालच्या सभेत पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीवर देखील टीका केली आहे. घराणेशाहीच्या राजकारणात अडकलेल्या राजकीय पक्षांना फक्त स्वतःच्या हिताची काळजी असल्याची टीका त्यांनी केली. सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”जम्मू आणि काश्मीरला कित्येक वर्षे घराणेशाहीच्या राजकारणाचा फटका सहन करावा लागला. त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबीयांची चिंता आहे. तुमच्या हिताची नाही. तुमच्या कुटुंबांना आणि या भागातील तरुणांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मला आनंद आहे की , जम्मू काश्मीरला या घराणेशाहीपासून सुटका मिळत आहे.”