सध्या पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मात्र दिल्लीच्या सर्व सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरपीएफ, पॅरामिलिट्री फोर्सेस तैनात करण्यात आल्या आहेत. शंभू सीमेवर शेतकरी व सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान केंद्र सरकार शेतकऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करत आहे. आज शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये पाचव्यांदा बैठक होणार आहे. त्यातून काही तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे आहे.
विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांबरोबर सर्व प्रकारची चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले. आम्ही संभाषण करून या प्रश्नावर मार्ग काढण्याचे प्रयत्न करत असून, आज सरकारने शेतकऱ्यांना चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी आमंत्रित केले आहे. चौथ्या फेरीची चर्चा झाल्यानंतर सरकार MSP च्या मागणीवर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे समजते आहे. तसेच इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करतो, असे कृषी मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले.
शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग?
शेतकऱ्यांच्या या आंदोलनात माओवादी सक्रिय झाले असल्याची अत्यंत महत्वाची बातमी माहिती महाराष्ट्र नक्षलविरोधी पक्षाने सरकारला दिली आहे. माओवाद्यांमुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची काळजी आता सरकारला घ्यावी लागणार आहे. गेल्यावेळी झालेल्या आंदोलनात दर्शपाल सिंग हे किसान मोर्चाचे नेते होते. तो आधी माओवाद्यांच्या कार्यकारिणीमध्ये सहभागी होता. त्यानंतर सीपीआय माओवाद्यांच्या सेन्ट्रल कमिटीने त्यांना निलंबित केले आहे. याने मागच्या वेळेस शेतकरी मोर्चाचे नेतृत्व केल्याचे समोर आले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनात माओवादी सक्रिय झाल्याची माहिती महाराष्ट्र नक्षलविरोधी पथकांचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली आहे.