गेले अनेक दिवस इस्त्राईल आणि हमास या दोघांमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. हमासला पूर्णपणे पराभूत केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे इस्त्राईल सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान यातच आता इस्त्राईल सरकारने सीरियावर एअरस्ट्राईक केल्याचे वृत्त समोर आले आहे. इस्त्राईलच्या वायुसेनेने सीरियामधील काफ सौसा या रहिवाशी भागावर हवाई हल्ला केला आहे. हे ठिकाण सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये आहे.
इस्त्राईल वायुसेनेने केलेल्या हवाई हल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सीरिया स्टेस्ट मीडिया आणि तेथील सुरक्षा सूत्रांनी सांगितले. सीरिया राज्य टीव्हीच्या माध्यमातून सूत्रांनी सांगितले की सकाळी ९ वाजून ४० मिनिटांच्या वेळेस झालेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख नागरिक म्हणून करण्यात आली आहे. सीरियन राज्य माध्यमांनी प्रकाशित केलेल्या प्रतिमांमध्ये एका बहुमजली इमारतीची जळलेली बाजू दिसण्यात आली. सुरक्षा स्त्रोताने सांगितले की “हल्ल्याने त्याचे उद्दिष्ट साध्य केले नाही”. हल्ला रहिवाशी भागात करण्यात आला. या ठिकाणी इमारती, शाळा आणि सांस्कृतिक केंद्रे आहेत. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.