“लाईन ऑफ एक्च्युअल कंट्रोल”वर (एलएसी) भारत व चीन दोन्ही देश शांतता आणि स्थैर्य कायम ठेवतील असा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात 19 फेब्रुवारी रोजी चुशुल-मोल्डो बॉर्डर मिटींग पॉईंटवर दोन्ही देशाच्या कमांडर्सची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 19 फेब्रुवारी रोजी भारत-चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील 21वी बैठक चुशुल-मोल्डो बॉर्डर मीटिंग पॉइंटवर झाली. चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांसमोर आपले विचार मैत्रीपूर्ण पद्धतीने मांडले. वास्तविक नियंत्रण रेषेसह सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी भारत आणि चीनने सहमती दर्शवली आहे. या आठवड्यात झालेल्या उच्चस्तरीय लष्करी चर्चेनंतरच यावर एकमत झाले आहे.
मात्र, सोमवारच्या चर्चेत साडेतीन वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटवण्याबाबत कोणतीही स्पष्ट चर्चा झाली नाही. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सीमावर्ती भागातून दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्याबाबत मागील भेटींमध्ये झालेल्या चर्चा हा भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील शांततेचा महत्त्वाचा आधार आहे.मंत्रालयाने सांगितले की चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण पद्धतीने एकमेकांसमोर आपले विचार मांडले. दोन्ही बाजूंनी मध्यंतरी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता राखण्याची ग्वाही दिली आहे.