जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरीही सीबीआयकडून छापे मारण्यात आले आहेत. सीबीआयने दिल्लीत आत्तापर्यंत 30 ठिकाणी छापे मारले आहेत.
जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने ही छापेमारी केली आहे. मुंबईसह राजस्थान, हरियाणा, बिहार, यूपी या ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टसाठी 2,200 कोटी रूपयांचे नागरी कामाचे कंत्राट देण्यात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 2019 मध्ये छापेमारी करण्यात आली होती. तसेच 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या कालावधीमध्ये माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या प्रोजेक्टशी संबंधित दोन फाईल्स मिटवण्यासाठी 300 कोटी रूपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, यापूर्वी सीबीआयने सांगितले होते की, किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टसाठी 2,200 कोटी रूपयांचे नागरी कामाचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.