शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता आपले सरकार कटिबद्ध होते आणि राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद.येथे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते.
” सरकारने देशभरात 60,000हुन अधिक अमृत सरोवरांची निर्मिती केली आहे. या उपक्रमामुळे केवळ शेतकऱ्यांना फायदा होणार नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल. आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याची माहिती प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आहेत.
आधीच्या सरकारांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वीच्या सरकारांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या गरजा तुकड्यांमध्ये पाहिल्या. गावातील प्रत्येक घटकाला प्राधान्य देऊन काम पुढे नेत आहोत. अहमदाबादमध्ये गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) च्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला पंतप्रधान संबोधित करत होते.
शेतकऱ्यांना ऊर्जा पुरवठादार तसेच खत पुरवठादार बनविण्यावर सरकारचा भर असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले.की, लहान शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, पशुसंवर्धनाची व्याप्ती वाढवणे, जनावरांचे आरोग्य सुधारणे, पशुपालनाला प्रोत्साहन देणे तसेच गावागावात मत्स्यपालन आणि मधमाशी पालनावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधींच्या विधानाचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, भारताचा आत्मा खेड्यात राहतो. विकसित भारत घडवण्यासाठी भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे.
ते म्हणाले की, आम्ही प्रथमच पशुपालक आणि मत्स्यपालकांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हवामान बदलाचा सामना करू शकणारे आधुनिक बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. भाजप सरकार राष्ट्रीय गोकुळ मिशन सारख्या मोहिमेद्वारे दुभत्या गुरांच्या जाती सुधारण्याचे काम करत आहे. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही शेतकरी कल्याणासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. सरकारने देशभरात 60,000 हून अधिक अमृत सरोवर तयार केले आहेत. या उपक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा तर होईलच शिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल. आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याची माहिती देशातील लहान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनला सुवर्णमहोत्सवानिमित्त शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी गुजरातच्या गावांनी मिळून जो वृक्ष लावला होता तो आज एक मोठा वटवृक्ष बनला आहे. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशात अनेक ब्रँड तयार झाले, पण अमूलसारखे एकही नाही. आज अमूल हे भारतातील पशुपालकांच्या ताकदीचे प्रतीक बनले आहे. लहान पशुपालकांची ही संघटना आज ज्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे ती संघटना आणि सहकार्याची ताकद आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, ‘सरकार’ आणि ‘सहकार’ यांच्यातील अद्भुत समन्वयामुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे. आज भारतातील सुमारे ८ कोटी लोक थेट डेअरी क्षेत्राशी निगडीत आहेत. ते म्हणाले की, आज आपण जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहोत. 8 कोटी लोक भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्राशी थेट संबंधित आहेत. गेल्या 10 वर्षात भारतातील दुधाचे उत्पादन सुमारे 60 टक्क्यांनी वाढले आहे. दरडोई दुधाची उपलब्धताही गेल्या १० वर्षांत सुमारे ४० टक्क्यांनी वाढली आहे. जगातील दुग्धव्यवसाय क्षेत्र केवळ २ टक्के दराने वाढत आहे. तर भारतातील दुग्ध व्यवसाय ६ टक्के दराने वाढत आहे.
भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राचा खरा कणा महिला असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, अमूल आज ज्या यशाच्या शिखरावर आहे ती केवळ स्त्री शक्तीमुळेच. ते म्हणाले की, भारताला विकसित करण्यासाठी भारतातील प्रत्येक महिलेची आर्थिक शक्ती वाढवणे आवश्यक आहे, त्यामुळे आमचे सरकार महिलांची आर्थिक शक्ती वाढविण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करत आहे. मुद्रा योजनेंतर्गत सरकारने दिलेल्या 30 लाख कोटींहून अधिक लाभार्थ्यांपैकी 70 टक्के लाभार्थी बहिणी आणि मुली आहेत.
पंतप्रधान पुढे म्हणाले की मुद्रा योजनेंतर्गत सरकारने 30 लाख कोटी रुपयांची रक्कम वितरित केली आहे. विशेष म्हणजे, या योजनेतील जवळपास ७० टक्के लाभार्थी महिला आहेत. गेल्या 10 वर्षात महिला बचत गटांशी (SHG) संबंधित महिलांची संख्या 10 कोटींहून अधिक झाली आहे.