इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामाच्या वेळापत्रकाचा पहिला टप्पा आज जाहीर करण्यात आला आहे. देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सध्या पहिल्या 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या या मोसमातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)शी होणार आहे.
सध्या, सुरुवातीच्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, ज्यामध्ये 4 डबल हेडर असतील. आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ठरणार आहे.
https://twitter.com/StarSportsIndia/status/1760636710072033766
यावेळी आयपीएलची पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी यांच्यामध्ये होणार आहे. शुक्रवारी होणारा हा सामना रात्री 8 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे कारण त्याआधी बीसीसीआय आयपीएलच्या नवीन हंगामाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
मोसमातील दुसरा सामना पंजाब आणि दिल्ली यांच्यात होणार असून तो मोहाली येथे होणार आहे. तिसरा सामना नाइटरायझर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोलकाता येथे होणार आहे. हंगामाच्या पहिल्या वीकेंडची सुरुवात दुहेरी हेडरने होईल आणि शनिवार आणि रविवारी प्रत्येकी दोन सामने खेळवले जातील.