महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि निष्ठावंत शिवसैनिक मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. गुरूवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने हिंदूजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. मागील अनेक दिवसांपासून मनोहर जोशी यांची प्रकृती खराब असल्यामुळे ते राज्याच्या राजकारणापासून दूर होते.
मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. तसेच ते शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते होते. मनोहर जोशी यांनी मुंबईचे महापौर, विधानपरिषदेचे आमदार, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषवली होती.
मनोहर जोशी हे 1976 ते 1977 या काळात मुंबईते महापौर होते. तर 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यानंतर ते लोसभेत गेले होते. तसेच शिवसेना आणि भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यानंतर मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले होते.