केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील विक्रोळी येथील बुलेट ट्रेन रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली आहे. या पाहणीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, हा बोगदा 21 किमी लांबीचा असून त्यातील 7 किमीचा भाग हा समुद्राखाली असेल.
यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, बोगद्याच्या आत गाड्या ताशी 320 किमी वेगाने धावू शकतील. जोपर्यंत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते, तोपर्यंत या प्रकल्पाला परवानगी दिली नाही. मात्र जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला. तेव्हा आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तर आता या प्रकल्पाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी काही नवकल्पना करण्यात आल्या आहेत. एकाच वेळी चारही दिशांनी काम सुरू आहे. हा भारतातील पहिला हाय-स्पीड कॉरिडॉर प्रकल्प आहे.
या प्रकल्पातील आमचे सर्वात मोठे उद्दिष्ट त्याच्या डिझाइनची क्षमता समजून घेणे आहे. या हाय-स्पीड ट्रेनचा पहिला विभाग जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये सूरत आणि बिलीमोरा दरम्यान सुरू होईल. तसेच हायस्पीड रेल्वे प्रकल्पात शिंकानसेन यंत्रणा बसवली जात आहे. ही यंत्रणा जगातील सर्वात सुरक्षित प्रणालींपैकी एक आहे, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.