सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहे. देशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. सर्वच पक्षांनी यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र त्याआधी पेट्रोल डिझेलचे दर देखील कमी केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्य्या तेलाच्या किंमतीमध्ये कपात झाल्याने भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. कच्य्या तेलाच्या किंमती घसरल्याने भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. सध्या भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतिही घसरण झालेली नाही.
आखातातील देशांशिवाय अमेरिकेच्या तेलाच्या दरामध्ये देखील घसरण झाली आहे. मात्र सध्या देशांतील पेट्रोल-डिझेलच्या दारांवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाहीये. अजूनही इंधनाचे दर स्थिर असल्याचे समजते आहे. २०२२ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर कमी करून सवलत देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर दर स्थिर असल्याचे दिसते आहे. चालू आर्थिक वर्षात तेल कंपन्यांचा नफा ९० हजार कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात बदल झालेला नाही.
सरकारी omc ने एप्रिल २०२२ पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर मे महिन्यामध्ये केंद्र सरकारने करामध्ये कपात करून सर्व सामान्य लोकांना दिलासा दिला होता. या कपातीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली होती. दरम्यान, या महिन्याच्या अखेरीस सर्व कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. त्यानंतर कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती पाहून कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती ५ ते १० रुपयांनी कमी करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सर्व सामान्य लोकांना दिलासा मिळणार आहे.