गेल्या वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने पुणे धरणसाखळीत कमी पाणीसाठा जमा झाला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. मात्र आता पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. भर उन्हाळ्यामध्ये पाणीकपातीपासून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित यावर यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीपासून दिलासा मिळणार आहे.
गेल्या वर्षी पुण्यात नेहमीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला या धरणसाखळी क्षेत्रात नेहमीएवढा पाणीसाठा जमा झाला नव्हता. त्यामुळे गेल्या महिन्यापासूनच पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट होते. पिण्याच्या पाण्यासह पुणे जिल्ह्यात शेतीसाठी देखील पाणी सोडण्यात येणार आहे. शेतीसाठी उन्हाळ्यात २ आवर्तन पाणी सोडले जाणार आहे. पहिले आवर्तन हे ३ मार्चपासून सुरु होणार आहे. शेतीसाठी ७ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे.
पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला या धरणांचा समावेश आहे. यंदा पाणीसाठा कमी असल्याने पुढील पाच महिने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आजच्या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास तरी पाणीकपातीची टांगती तलवार पुणेकरांवरून दूर झाली आहे. मात्र पुढील बैठकीत पाणीसाठा किती शिल्लक आहे, व त्याचे नियोजन यावरून हा निर्णय बदलला देखील जाण्याची शक्यता आहे.