लोकसभेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी झाली असून चार राज्यांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत.दिल्ली, हरयाणा, गोवा आणि गुजरातसाठी जागावाटप ठरले आहे.
आप दिल्लीमध्ये चार जागा लढवेल, तर काँग्रेस तीन जागा लढवेल. गुजरातमध्ये काँग्रेस २४ जागा लढवेल, तर आप दोन जागावर उमेदवार देईल. हरियाणात काँग्रेस नऊ तर आप एका जागावर निवडणूक लढवेल.तर काँग्रेस गोवामध्ये दोन्ही जागा लढणार आहे. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये चर्चेच्या फेरी सुरु होत्या. त्यानंतर आज जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर एकमत झाले आहे. दिल्लीमध्ये आप नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीमधून उमेदवार देईल. तर काँग्रेस चांदणी चौक, उत्तर पूर्व आणि उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उतरवेल अशी माहिती समोर आली आहे.
पण पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. पंजाबमध्ये आपची सत्ता आहे. या राज्यात लोकसभेच्या १३ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं ८, तर आपनं १ जागा जिंकली होती.या राज्यात लोकसभेच्या १३ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ८, तर आपने १ जागा जिंकली होती.