एप्रिल मे महिन्यात देशात लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विरोधकांनी भाजपा सत्ते येऊ नये साठी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे तर, एनडीए पुन्हा एकदा सत्त्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजपाने देशभरात ४०० पार चा नारा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि इतर ज्येष्ठ नेते बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच बिहार दौरा असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबाद आणि बेगुसराय येथे जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. या ठिकाणी ते कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. भाजपच्या सूत्रांनुसार, पंतप्रधान मोदी २ मार्च रोजी बिहारमधील औरंगाबाद आणि बेगुसराय लोकसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करतील, जिथे ते बिहारशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील.
पंतप्रधान मोदींच्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीतामढी, सिवान आणि दरभंगा येथे २८ फेब्रुवारी आणि २८ मार्च रोजी सार्वजनिक सभांना संबोधित करतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ मार्च रोजी पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील पालियागंज येथे जाहीर सभेला संबोधित करतील. भाजपच्या विजयासाठी बिहार आणि उत्तर प्रदेश ही दोन्ही राज्ये महत्त्वाची आहेत. भाजपने दोन्ही राज्यांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे.
यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने ३५३ जागा जिंकल्या होत्या, उत्तर प्रदेशमध्ये जास्त जागा जिंकल्या होत्या आणि इतरांनी कमी जागा जिंकल्या होत्या. ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत मतदान झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुका होणे अपेक्षित आहे.