मराठा समाजाला राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण दिले आहे. हे आरक्षण विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. मात्र सगेसोयऱ्याची अंमलबजावणी न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. आजपासून संपूर्ण राज्यात रास्ता रोको आणि धरणे आंदोलन करण्यास सुरवात झाली आहे. यादरम्यान अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
दोन दिवसांपूर्वी अजय बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही आरोप केले होते. मात्र त्यानंतर अजय बारसकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र आज अजय बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवर काही गंभीर आरोप केले आहेत.
मी परवाच्या पत्रकार परिषदेत त्यांच्यावर कोणतेही वैयक्तिक आरोप केलेले नाहीत. मी त्यांना आरक्षणावर प्रश्न बिचारले. त्यांनी माझ्यावर बलात्काराचे, विनयभंगाचे, असे आरोप करण्यासाठी ४० लाख रुपये घेतल्याचे आरोप माझ्यावर केले. त्यांचा अभ्यास कमी आहे, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही. त्यांचा स्वभाव अहंकारी आहे. तुकाराम महाराजांची मागितलेली माफी ही अहंकारमिश्रित असल्याचे बारसकर म्हणाले. माझ्यावर केवळ दोनच गुन्हे असून त्याची चौकशी सुरु असल्याचे ते म्हणाले.
जरांगे पाटलांनी केवळ माझ्यावरचं नाही तर माध्यमांवर देखील आरोप केले. ते म्हणाले याचा आणि माझा संबंध नाही. त्यांनीच मला तिथे मला बोलावले याचे पुरावे माझ्याकडे आहेत.मी मराठा आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझीही इच्छा आहे. जरांगे पाटलांनी संतांचा व माझा अपमान केल्यामुळे त्यांच्या कोअर कमिटीने माझी माफी मागितली. त्याची व्हिडीओ क्लिप देखील अजय बारसकर यांनी माध्यमांसमोर ऐकवली.