गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण हे सतत बदलतना दिसत आहे. राज्यासह देशातील हवामान देखील बदलताना दिसत आहे. कुठे पाऊस, कुठे गारपीट, कुठे बर्फवृष्टी तर, कुठे कडक उन्हाळा पाहायला मिळतो आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये देशासह राज्यातील वातावरणात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार नागपूर,वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडटासह, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात गारपीट झाली तर शेतकरी राजा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. खबरदारीसाठी शासनाने दिलेल्या उपायांचे,नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील हवामानात सतत बदल होत आहेत. काही ठिकाणी कडक उन्हाळा, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. हवामान विभागाने मराठवाड्यात देखील तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.