देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच अनेक ठिकाणी विरोधी पक्षातील आमदार खासदार सत्तेचे वारे कोणाच्या बाजूने आहे ते पाहून त्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात पक्षबदल झालेले पाहायला मिळत आहे आणि नंतरही तसे होण्याची शक्यता आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.
काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला निवडणुकीआधी मोठा झटका बसला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्याआधीच काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे तेथील राजकीय समीकरणे आता बदलली आहेत. काँग्रेसबरोबरच एनपीपीचे दोन आमदार देखील भाजपात सामील झाले आहेत. या चारही आमदारांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग व वांगलिंन लाऊनदोंग हे भाजपात सामील झाले आहेत. काँग्रेस व एनपीपी आमदारांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह भाजपाचे निवडणूक प्रभारी अशोक सिंघल हे देखील उपस्थित होते. ६० विधानसभा सदस्य असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. आता चार आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाची विधानसभेतील ताकद ही ५६ वर पोहोचली आहे. काँग्रेसकडे दोन आणि अपक्ष दोन एकूण चार विरोधी आमदार विधानसभेत आहेत.