पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन करणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेल्वेशी संबंधित प्रकल्पांची भेट देखील देशाला देणार आहेत. कोट्यवधींची भेट मोदी आज देशाला देणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५४ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि विविध विकासकामांची भेट देणार आहेत. याबाबतची माहिती त्याची एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. आजचा दिवस रेल्वेसाठी महत्वाचा असल्याचे मोदी एक्स या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि शुभारंभ करणार आहेत. विकसित भारतासाठी करण्यात येत असलेली कामे ही लोकांचे जीवनात सुलभता वाढवण्यास मदत करतील असे मोदी म्हणाले.
https://twitter.com/narendramodi/status/1761950629617074183
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध प्रकल्पांचे उदघाटन करणार आहेत, त्यामध्ये अनेक पायाभूत सुविधा आणि रेल्वशी संबंधित प्रकल्प यांचा समावेश आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सर्व राज्यांमधील आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ५३३ रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली आहे. १९ हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करून या विकासकामांचे शुभारंभ करण्यात येणार आहे. या स्थानकाच्या विकासानंतर येथे भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे.