मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांनी आज त्यांच्या सहजीवनाची सुरूवात केली आहे. सध्या त्यांच्या विवाहसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपूर्वीच तितिक्षाने केळवणाचा फोटो शेअर तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची घोषणा केली होती. तर अखेर आज या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यात त्यांच्या परिवारासोबत कलाविश्वातील मित्रमैणींनी हजेरी लावली होती. यामध्ये सुरूची अडारकर, रसिका सुनील, ऐश्वर्या नारकर, ऋतुजा बागवे या कलाकारांनी सिद्धार्थ-तितिक्षाच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
तितिक्षाने लग्नासाठी ऑफ व्हाईट आणि गोल्डन किनार असलेली नऊवारी साडी नेसली होती, ज्यात ती खुपच सुंदर दिसत होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचे धोतर घातले होते. तर तितिक्षा आणि सिद्धार्थच्या या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच आता तितिक्षा-सिद्धार्थवर सोशल मीडियावरून चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
दरम्यान, तितिक्षा आणि सिद्धार्थ हे ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम करत होते. या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची चांगली मैत्री झाली होती. मालिका संपल्यानंतर त्या दोघांच्या मैत्रिचे प्रेमात रूपांतर झाले. तर मागील अनेक दिवसांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते.