भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. भारताने चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडला धूळ चारली आहे. तसेच चौथा कसोटी सामना जिंकत भारताने कसोटी मालिका आपल्या खिशात टाकली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडवर ५ विकेट्सनी विजय मिळविला आहे. इंग्लडने भारताला १९२ धावांचे दिले होते. भारतीय संघाने ५ विकेट्सनी हा सामना जिंकला आहे. त्यामुळे पाच सामन्यांचा कसोटी मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १९२ धावांचे आव्हान हे ६१ ओव्हर्समध्ये ५ विकेट्समध्ये पूर्ण केले. शुबमन गिल आणि आकाश दीप या जोडीने भारताच्या विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावली. भारतीय संघाचा भारतातील हा १७ वा विजय ठरला आहे. इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लडने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या. भारतीय संघाकडून सर्वाधिक ४ बळी हे रवींद्र जाडेजाने घेतले. आकाश दीप याने ३ बळी घेतले. मोहम्मद सिराजने २ व अश्विनने १ बळी घेतले.
कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी धावांचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने खेळण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा ५५ आणि यशस्वी जैस्वाल ३७ धावा करून बाद झाले. रजत पाटीदार शून्यावर बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि सर्फराज खान यांना इंग्लंडने स्वस्तात बाद केले. त्यामुळे काही काळ भारतीय संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर ध्रुव आणि शुबमन गिल यांनी भारताचा डाव सावरला. त्यामुळे भारतीय संघाने विजय प्राप्त केला आहे. तसेच कसोटी सामन्यांची मालिका देखील आपल्या खिशात टाकली आहे.