गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण हे सतत बदलतना दिसत आहे. राज्यासह देशातील हवामान देखील बदलताना दिसत आहे. कुठे पाऊस, कुठे गारपीट, कुठे बर्फवृष्टी तर, कुठे कडक उन्हाळा पाहायला मिळतो आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये देशासह राज्यातील वातावरणात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, जोरदार गारपीट देखील झाली आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील २ ते ३ दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला होता. विदर्भ मराठवाड्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. ऐन थंडीत पाऊस झाल्याने नागरीकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी नगर, जालन्यातील भोकरदन तसेच अन्य काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे.अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी राजा आता संकटात सापडला आहे. पिकांचे नुकसान झाले असू, नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यात देखील निसर्ग कोपला असल्याचा पाहायला मिळाले. जोरदार विजांसह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. इकडे अकोला जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक रस्त्यावर झाडे पडल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले होते. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरील झाडे बाजूला हटविण्याचे काम सुरु होते. वादळी वारे आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा, भाजीपाला आणि आंबा पिकाला मोठा फटका बसल्याचे समोर येत आहे.
राज्यातील हवामानात सतत बदल होत आहेत. काही ठिकाणी कडक उन्हाळा, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. हवामान विभागाने मराठवाड्यात देखील तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.