आम्ही कुणाला डिवचणार नाही, मात्र आम्हाला कोणी येऊन डिवचले डिवचलं तर आम्ही सोडणार नाही. ही आमची नीती आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत.व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटमध्ये बोलत असताना राजनाथ सिंह यांनी हा इशारा दिला आहे. भारताने कधीच कुठल्याही देशावर हल्ला केला, आक्रमण केले नाही. तसेच शेजाऱ्याच्या एक इंच जागेवरही ताबा सांगितला नाही, आणि असे करणारा भारत जगातला एकमेव देश आहे. याबाबत भारतावर कुणीही बोट ठेवू शकत नाही, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी देशाच्या परराष्ट्र नीतीवरही भाष्य केले आहे. पीओकेची चिंता करू नका. तिथले लोकच भारतात येण्याची मागणी करतील. पाकिस्तान व्याप्त काश्मीरचे लोक भारतात यायला उत्सुक होतील, असे मी आधीही म्हंटले होते. तिथले लोक भारतात यायला उत्सुक आहेत. या पुढे काय होते ते पहा असे सूचक विधान राजनाथ सिंह यांनी केले आहे. तसेच शांततेच्या काळातही कोणत्याही स्वाभिमानी देशाच्या सैन्याला तयार राहिलं पाहिजे. कुणावर आक्रमण करण्यासाठी नव्हे तर आपल्या संरक्षणासाठी ही तयारी असली पाहिजे, अशा सूचना लष्कराला दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्याच नव्हे तर चौथ्या टर्मचीही भविष्यवाणी केली. मोदी तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान होणार आहेतच. पण चौथ्या टर्मलाही पंतप्रधान होणार आहेत. मी जेव्हा भविष्यवाणी करतो, तेव्हा ती खरीच ठरते. ती खोटी ठरत नाही, असे राजनाथ सिंह यांनी विधान केले आहे . मोदींच्या नेतृत्वाखाली देशात करिश्मा झाला आहे.आर्थिक आघाडीवर चमत्कार झाला आहे.कोरोनाच्या काळात आपली इकॉनॉमी सांभाळणं ही छोटी गोष्ट नव्हती. आपल्या इकॉनॉमीचा ग्रोथ रेट वाढत आहे.जगातील कोणत्या देशाच्या इकॉनॉमीचा इतका झपाट्याने ग्रोथ रेट वाढलेला नाही. जगातील सर्वात फास्टेट ग्रोईंग इकोनॉमी भारताची आहे. आत आपण चार ट्रिलियन इकॉनॉमी झालो आहोत.