राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली आहे आहे. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अजित पवारांनी कुसुमाग्रजांची कविता सादर करून भाषण सुरू केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनाही अभिवादन केले.
अजित पवार हे 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. पुढील 4 महिन्याचा हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर या अर्थसंकल्पात पुढील चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या अर्थसंकल्पात अजित पवारांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणा केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने घेतलेले 10 महत्त्वाचे निर्णय:
1. एक लाख महिलांना रोजगार दिला जाणार आहे. आंगणवाडी सेविकांची 14 लाख पदे भरण्यात आली. तर 37 हजार आंगणवाडींना सौर उर्जा दिली जाणार आहे. तसेच 5 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी दिल्या जाणार आहेत.
2. जानेवारी 2024 मध्ये दवोस येथे 19 कंपन्यांसोबत करार झाले आहेत.
3. महिला आणि बालकल्याण विभागाला 3107 कोटी रूपयांची तरतूद देण्यात आली.
4. ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत 196 कोटी रूपये निवेदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी मॉल करण्यात येणार आहेत. सोबतच निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येणार आहेत.
5. मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रेडिओ क्लब जेटीसाठी 227 कोटी रूपयांचे काम सुरू होणार आहे. सोबतच सामान्य प्रशासन विभागास 1 हजार कोटी रूपये प्रस्तावित आहे. तर वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत शिधा वाटप करताना एका महिलेस एक साडी देण्याचे काम सुरू आहे.
6. सौर आणि कृषीपंप योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणार आहे. यामध्ये 8 लाख 50 हजार नवीन कृषीपंप बसवण्यात येणार आहेत. तसेच शेळी मेंढी वराह योजनेअंतर्गत 129 प्रकल्पांचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला आहे. येत्या तीन वर्षांमध्ये 155 प्रकल्पांची दुरूस्ती करण्यात येईल त्यासाठी 15 हजार कोटी रूपयांची गरज आहे.
7. सार्वजनिक बांधकामासाठी 19 हजार कोटी रूपये देण्यात येत आहेत. तसेच 7 हजार 500 किमी रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार आहेत.
8. संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी अर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील वेल्लोरा येथे रात्रीचे विमान उतरण्यासाठी काम सुरू आहे. एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरू आहे.
9. भारतातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपादन पूर्ण झाले आहे. तर सोलापूर तुळजापूर धाराशिव येथे रेल्वे मार्गासाठी भुसंपादन सुरू आहे. तसेच सरकार जालना-यवतमाळ-पुणे-लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम देईल. ही चौथी मार्गिका असणार आहे.
10. पालघरपर्यंत वर्सोवा वांद्रे सागरी सेतू केला जाणार आहे. तसेच मिरकरवाडा बंदर नव्याने करण्यात येणार आहे.