कलम ३७० वर आधारित एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामी गौतम आणि प्रियामणी या त्यामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहेत. दरम्यान या चित्रपटाने कालपर्यंत बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने ३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये ३४ कोटींची कामे या चित्रपटाने केली आहे.
आर्टिकल ३७० या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर ३.२५ कोटींची कमाई केली आहे. भारतातील या चित्रपटाचे एकूण कमाई ही २६.१५ कोटी इतकी आहे. यामी गौतमने आर्टिकल ३७० चित्रपटाच्या कमाईवर भाष्य केले. तिने केलेल्या पोस्टनुसार या चित्रपटाने जगभरात ३४.७१ कोटींची कमाई केली आहे. ‘आर्टिकल ३७०’ २३ फेब्रुवारी रोजी जगभरातील सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांवर आधारित आहे.
दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदित्य सुहास जांभळे यांनी ‘अनुच्छेद ३७०’ चे दिग्दर्शन केले आहे.चित्रपटामध्ये अरुण गोविल, वैभव तत्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार आणि इरावती हर्षे मायादेव यांनी काम केले आहे. या चित्रपटाची कथा आदित्य धर आणि मोनल ठकार यांनी लिहिली आहे, पटकथा आणि संवाद आदित्य सुहास जांभळे आणि अर्जुन धवन आणि अतिरिक्त पटकथा आर्ष व्होरा यांनी लिहिली आहे.
रिलीजआधी काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
जम्मू येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. मात्र २०१९ मध्ये केंद्र सरकारने हरविलेल्या आर्टिकल ३७० बद्दल देखील भाष्य केले. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी हा निर्णय महत्वाचा होता, असे ते म्हणाले. तसेच बोलताना त्यांनी आता आर्टिकल ३७० वर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे ते म्हणाले. मला हा चित्रपट कसा आहे ते माहिती नाही पण याबद्दल मी टीव्हीवर पाहिले. आता तुमचा जयजयकार होणार असून, लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.