माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी संथन याचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकेचा नागरिक असलेल्या संथनला काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या राजीव गांधी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर हॉस्पिटलचे डीन डॉ. व्ही थेरनीराजन यांनी सांगितले की, सकाळी 7.50 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने संथनचे निधन झाले.
डॉक्टर थेरनीराजन यांनी सांगितले की, यकृत निकामी झाल्याने संथनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज, बुधवारी पहाटे 4 वाजता त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि सकाळी 7.50 च्या सुमारास त्याचे निधन झाले. संथन हा त्या तीन दोषींपैकी एक होता ज्याची 1999 मध्ये सुप्रीम कोर्टाने हत्येच्या कटातील सहभागासाठी फाशीची शिक्षा कायम ठेवली होती, जी नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली होती.
राजीव गांधी हत्याप्रकरणात संथन व्यतिरिक्त मुरुगन आणि पेरारिवलन यांचा समावेश होता. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या तिघांचीही सुटका करण्यात आली. नोव्हेंबर 2022 मध्ये या तिघांना सोडण्यात आले होते.
सुटकेनंतर संथनसह अन्य आरोपींना त्रिची सेंट्रल जेलच्या विशेष कॅम्पसमध्ये ठेवण्यात आले होते. तर सर्व आरोपी हे श्रीलंकेचे होते. तसेच त्यांच्याकडे पासपोर्ट, प्रवासाची कागदपत्रे नव्हती. पण संथनने मद्रास हायकोर्टात अर्ज दाखल करून त्याला त्याच्या वृद्ध आईला भेटण्यासाठी त्याला श्रीलंकेला पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. मात्र, याबाबत काही निर्णय होण्यापूर्वीच संथनचे निधन झाले आहे.