बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहेत. या लोकप्रिय कपलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ही गुड न्यूज शेअर करताच चाहत्यांनी आणि बॉलिवूड कलाकारांनी दीपिका आणि रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दीपिका पदुकोण प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आज दीपिकाने सोशल मीडियावर ही गुड न्यूज शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
या गुड न्यूजबाबतची एक पोस्ट दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ती कोणत्या महिन्यात बाळाला जन्म देणार आहे याचा खुलासा केला आहे. दीपिका सप्टेंबर 2024 मध्ये बाळाला जन्म देणार आहे. तिने ही पोस्ट शेअर करताच काही मिनिटांमध्येच लाखो लोकांनी या पोस्टला लाईक करत कमेंटमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये दीपिकाचा बेबी बंप तिच्या साडीच्या लूकमध्ये दिसत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. तेव्हापासून दीपिकाच्या गरोदरपणाची चर्चा सुरू होती. त्यावेळी या चर्चांबाबत दीपिका-रणवीरने कोणतेही भाष्य केले नव्हते.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नोव्हेंबर 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे कपल आई-बाबा बनणार आहे. दीपिका आणि रणवीर हे बी-टाऊनमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. ही जोडी ‘दीपवीर’ या नावाने ओळखली जाते.