मध्य प्रदेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मध्ये प्रदेशच्या डिंडोरी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये १४ जणांचा मृत्यू तर २१ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमींमधील काही जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे कळते आहे. डिंडोरी जिल्ह्यातील बडझर घाटात पीकअपचा भीषण अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, बडझर घाटात पिकअप चालवणाऱ्या ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने पिकअप घाटामध्ये पलटी झाला. या अपघातामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत. एका कार्यक्रमावरून घरी परतत असताना या पिकअपला बडझर घाटात अपघात झाला आहे. शाहपुरा सार्वजनिक रुग्णालयात या सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव बचावकार्य सुरु केले.
या दुर्घटनेवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये मदत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मंत्रिमंडळातील एक कॅबिनेट मंत्री घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातामधील सर्व जण देवरी या ठिकाणचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे.