केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने आता औषधांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. NPPA म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे आता संसर्ग, ताप, शुगर, कोलेस्ट्रॉलसह 100 औषधांचे दर कमी होणार आहेत.
सध्या देशात वैद्यकीय उपचार घेणे खूप महाग होत चालले आहे. अशातच आता केंद्र सरकारने औषधांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता संसर्ग, ताप, शुगर, कोलेस्ट्रॉल, अंगदुखी, व्हिटॅमिन डी3, कॅल्शियम, अँटिबायोटिक्स यासह 100 औषधे स्वस्त होणार आहेत.
औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी 69 फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करण्यात आल्या असून, याबाबतची अधिसूचना NPPA ने जारी केली आहे. NPPA ने नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31 ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल्स विभागाच्या NPPA ने अधिसूचना जारी केली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या महामारीनंतर औषधांच्या किमती आणि वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले होते. अशातच फेब्रुवारीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंत महिनाभरातच दुसऱ्यांदा सरकारने औषधांच्या किमती कमी केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.