पश्चिम बंगालमधील संदेशाखाली येथील प्रकरणामध्ये अखेर पश्चिम बंगाल पोलिसांनी महत्वाची कारवाई केली आहे. संदेशाखाली येथील प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या शाहजहान शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. शाहजहान शेख हे तृणमूल काँग्रेसचे नेते देखील आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या बशीरहाट न्यायालयाने आज तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) शाहजहान शेखला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंगाल पोलिसांनी ही अटक केली आहे. बंगाल पोलिसांनी शाहजहान शेखला सरबेरिया येथून रात्रीच अटक केली आहे.
पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते (एलओपी), सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेते शेख शाहजहान यांच्या अटकेवर शंका व्यक्त केली आहे. ”ही अटक नसून, परस्पर जुळवाजुळव आहे”, असे सुवेंद्र अधिकारी म्हणाले. शाहजहान शेख यांची बाजू वकील राजा भौमिक याची न्यायालयात मांडली. पोलिसांनी शाहजहान शेखच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत छापेमारी दरम्यान ईडी अधिकाऱ्यांवर कथित हल्ला केल्याप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी शाहजहानला आज सकाळी अटक केली आहे. दरम्यान, संदेशाखाली प्रकरणात कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारवर कठोर ताशेरे ओढले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख याना अटक होणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. शाहजहान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर संदेशखाली येथील महिलांवर अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच जबरदस्तीने जमीन हडपत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. संदेशाखाली परप्रकणात चौकशीसाठी गेलेल्या ठिकाण ईडीच्या पथकावर हल्ला झाल्यापासून शाहजहान शेख हे फरार होते.
दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने संदेशखालीसह सात ग्रामपंचायतीमध्ये अर्धा किलोमीटरच्या परिसरात कलम १४४ लागू केले आहे. संदेशखाली येथे महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे संदेशाखाली प्रकरण: आरोपी शाहजहान शेखला १० दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टाचा निर्णय
त्या भागात भाजपाने आंदोलन सुरु केले आहे. त्यादृष्टीने परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी १९ फेब्रुवारीपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.