पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी संयुक्तपणे आज मॉरिशसमध्ये सेंट जेम्स जेट्टीचे व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन केले. यासोबतच या दोघांनी संयुक्तपणे सहा सामुदायिक विकास प्रकल्प आणि मॉरिशसमधील अगालेगा या नवीन हवाई पट्टीचे उद्घाटन केले.मॉरिशसचा मुख्य भूभाग आणि अगालेगा यांच्यात चांगल्या संपर्कव्यवस्थेची गरज या प्रकल्पांमुळे पूर्ण होईल. त्यामुळे सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार असून सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.त्यामुळे या प्रकल्पांचे उद्घाटन महत्त्वाचे मानले जात होते
यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ म्हणाले की, अगालेगा बेटावर आज आम्ही इतिहास घडवत आहोत, जिथे नवीन हवाई पट्टी, नवीन जेट्टी आणि इतर अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. मॉरिशस आणि भारत यांच्यातील उल्लेखनीय आणि अनुकरणीय भागीदारीसाठी हा कार्यक्रम आणखी एक चांगला क्षण असणार आहे. मॉरिशस-भारत संबंध आणि भागीदारीला नवा आयाम दिल्याबद्दल मी नरेंद्र मोदींचे आभार मानतो.
त्याचवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या ६ महिन्यांतील आमच्यातील ही पाचवी बैठक आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यातील मजबूत आणि अद्वितीय भागीदारीचा हा पुरावा आहे. ग्लोबल साउथचे सदस्य या नात्याने प्राधान्यक्रम देत आम्ही एक पुढचे पाऊल आज टाकले आहे.
पीएम मोदी म्हणाले, गेल्या 10 वर्षांत भारत-मॉरीशस संबंधांनी अभूतपूर्व दिशा घेतली आहे. या नात्यात आम्ही नवीन उंची गाठली आहे आम्ही वैज्ञानिक आणि ऐतिहासिक संबंधांना नवे रूप दिले आहे.विकासपूर्ण भागीदारी हा आमच्या संबंधांचा मुख्य आधारस्तंभ आहे. भारताने नेहमीच मॉरिशसच्या आकांक्षांचा आदर केला आहे आणि त्यांची पूर्तता केली आहे, असे ते म्हणाले.
2015 मध्ये अगालेगातील लोकांना दिलेल्या वचनाचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजचा दिवस भारत-मॉरिशस विकास सहकार्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. मला आनंद होत आहे की मी येथील लोकांच्या विकासासाठी केलेल्या वचनबद्धतेच्या पूर्ततेचा साक्षीदार आहे. यालाचा भारतात याला ‘मोदी की हमी’ म्हणले जाते.
प्रकल्पांच्या फायद्यांबद्दल बोलताना ते म्हणाले, “आज संयुक्तपणे उद्घाटन करण्यात आलेल्या या सुविधांमुळे राहणीमान सुलभ होईल. यामुळे मॉरिशसच्या उत्तर आणि दक्षिण भागांमधील संपर्क सुधारेल आणि मुख्य भूभागाशी प्रशासकीय संबंध सुधारेल. वैद्यकीय स्थलांतर आणि वाहतूक शालेय मुलांची स्थिती सुधारेल.”हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा, समृद्धी आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही देश सक्रियपणे काम करत असल्याचे मोदींनी नमूद केले.