सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान विधानभवनाच्या परिसरात बोलताना भाजपा आमदार नितेश राणे याची बडगुजर यांच्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर आरोप केले आहेत. सलीम कुत्ता यांच्याबरोबर पार्टी केल्याने ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांवर आरोप केले आहेत.
नितेश राणे यांनी संजय राऊतांवर बडगुजर आणि सलीम कुत्ता या प्रकरणावरून आरोप केले आहेत. ते म्हणाले, ‘बडगुजर हे महत्वाचे नाहीत तर, ‘सुधार बडगुजर यांचा गॉडफादर कोण आहे? संजय राऊतच यांचे गॉडफादर आहेत. त्यामुळे संजय राऊतांची देखील चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. १९९३ च्या बॉम्बस्फोटात ज्या दाऊदचा हात होता. त्याचा हस्तक सलीम कुत्ता बरोबर यांचे संबंध समोर आले आहेत.
प्रकरण काय?
कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर प्रकरणाची चौकशी सुरु आहे. नितेश राणेंनी १९९३ च्या बॉम्ब्सस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता बरोबर पार्टी केल्याचा आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला होता.