दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) एबीव्हीपी आणि डाव्या-समर्थित विद्यार्थी गटांमध्ये गुरुवारी रात्री शाळा ऑफ लँग्वेजेसमधल्या निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीवरून हाणामारी झाली असून या मध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या-समर्थित गटातील विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी केल्या आहेत.
गुरुवारी रात्री स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीवरून झालेल्या मतभेदांमुळे कथितपणे उफाळून आलेला हा वाद नियंत्रणाबाहेर जाऊन हिंसक झाला.
विद्यापीठातील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
, दिल्ली पोलिसांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे: “आम्हाला दोन्ही बाजूंकडून तक्रारी आल्या आहेत. आम्ही तक्रारींची तपासणी करत आहोत. आतापर्यंत पोलिसांना तीन जखमींबद्दल माहिती मिळाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अभाविपचे जेएनयूचे अध्यक्ष उमेशचंद्र अजमीरा यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. “डावे विद्यार्थी निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी करण्याचा प्रयत्न करत होते. स्कूल ऑफ लँग्वेजच्या विद्यार्थ्यांनी याबाबत आक्षेप घेतला असता संपूर्ण प्रक्रिया 3-4 पेक्षा जास्त काळ थांबवण्यात आली. जेव्हा प्रक्रिया पुन्हा होताच , तेव्हा आयशी घोष (जेएनयू अध्यक्ष) यांनी चार कम्युनिस्ट नावांची घोषणा केली आणि ते निवडून आल्याचे सांगितले.याबाबत इतर विद्यार्थी आक्षेप घेतला आणि खुलासा करण्याची मागणी केली तसेच मुक्त आणि न्याय्य प्रक्रियेद्वारे निवड करा, असे सुचविले मात्र यानंतर डाव्या विद्यार्थ्यांनी या दरम्यान गोंधळ सुरू केला आणि स्कूल ऑफ लँग्वेजेस येथे शिकण्यासाठी आलेल्या सामान्य विद्यार्थ्यांवर डाव्या विचारसरणीच्या गुंडांनी धारदार वस्तूंनी निर्दयीपणे हल्ला केला”.असे म्हणले आहे.”एबीव्हीपी जेएनयू विद्यार्थ्यांवरील या क्रूर हल्ल्याचा निषेध करते आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी नेहमीच उभे राहील अशी खात्री देते असेही त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये नमूद केले आहे.
तर डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी अभाविपच्या विद्यार्थी संघटनेवर गोंधळ निर्माण करून निवडणूक समितीच्या निवड प्रक्रियेत व्यत्यय आणल्याचा आरोप केला.”दिवसभर हे चोरटे जीबीएमच्या प्रक्रियेत व्यत्यय आणत राहिले. निवडणूक समितीसाठी कोणत्याही मुस्लिम विद्यार्थ्याचे नाग सुचवताच त्यांनी विरोध केला.तसेच विद्यार्थ्यांना धमकावून त्यांनी स्कूल ऑफ लँग्वेज परिसराचे वातावरण खराब केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष हिने केला आहे.
जेएनयू विद्यापीठाचे कुलगुरू संतश्री धुलीपुडी पंडित यांनी विद्यापीठ प्रशासन याप्रकरणी लक्ष घालून कठोर कारवाई करेल असे सांगितले आहे तसेच “जेएनयू (विद्यार्थी संघ) निवडणुका विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केल्या जातात. त्या शांततापूर्ण वातावरणात पार पडतील. त्यांची जबाबदारी आहे असे म्हणले आहे.