कॅनडाचे माजी पंतप्रधान ब्रायन मुलरोनी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ब्रायन मुलरोनी यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. ब्रायन मुलरोनी यांची मुलगी कॅरोलिन मुलरोनी यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशाच्या 18 व्या पंतप्रधानांचे निधन झाले आहे.
ब्रायन मुलरोनी यांच्यावर ऑगस्ट 2023 च्या अखेरीस हृदय शस्त्रक्रिया झाली होती. याशिवाय, त्यांच्यावर गेल्या वर्षाच्या सुरुवातीला प्रोस्टेट कर्करोगावर उपचार करण्यात आले होते.
ब्रायन मुलरोनी यांनी राजकारणात अनेक वर्षे पडद्याआड काम केले होते. 1976 मध्ये पुढील फेडरल प्रोग्रेसिव्ह कंझर्व्हेटिव्ह नेता होण्यापूर्वी त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. नंतर कंझर्व्हेटिव्हपासून ते वेगळे झाले. मात्र, ते जॉय क्लर्ककडून पराभूत झाले. पण, पराभवानंतरही ते निराश झाले नाहीत.
मुलरोनी कॉर्पोरेट कॅनडामध्ये वरिष्ठ कार्यकारी म्हणून रुजू झाले. नंतर 1983 मध्ये त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व जिंकले आणि सत्ता काबीज केली. त्या वेळी त्यांनी शपथ घेतली की, ‘आपण मिळून एक नवा पक्ष आणि नवा देश बांधणार आहोत.’ त्यानंतर ते सेंट्रल नोवा, एन.एस.चे खासदार म्हणून निवडून आले. यावेळी त्यांच्याकडून जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
ब्रायन मुलरोनी 1984 च्या फेडरल मोहिमेसाठी पुढे आले आणि त्यांनी कॅनडाच्या इतिहासातील सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. तसेच मुलरोनी यांनी कॅनडाचे 18 वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला होता.