नागरी सुरक्षेबाबत लोकांना जागृत करणे हा उद्देश आहे. जागतिक नागरी संरक्षण दिन दरवर्षी १ मार्च रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय नागरिक सुरक्षा संगठन (ICDO) ने 1990 मध्ये विश्व नागरिक सुरक्षा संगठनेची स्थापना केली. ही एक आंतरशासकीय संस्था आहे. ज्याचा उद्देश नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी लोकसंख्येचे संरक्षण करणे, त्यांना मदत करणे, मालमत्ता व पर्यावरणाचे संरक्षण सुनिश्चित करणाऱ्या संरचनेच्या राज्याद्वारे विकासात योगदान देणे आहे. तसेच या दिवशी विविध राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केले जातात.
नागरी संरक्षण म्हणजे देशाच्या राज्याच्या नागरिकांना हल्ल्यापासून, मोठ्या संकटापासून आणि नैसर्गिक आपत्ती पासून बचावणे,देशाच्या व राज्याच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अर्धसैनिक दल, गृहरक्षक दल ,अग्निशामक दल कार्यरत असतात.या दिवसानिमित्त दरवर्षी एक थीम ठरलेली असते. आपणही सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता वाढवूयात. स्वतःचे संरक्षण व बचाव कार्य करूया आणि संकट समयी स्वयंसेवक बनून देशाचे नागरिकत्व बजावूयात . त्यासाठी काही घोषवाक्यांचा प्रचार करूया.
१) भारतीय आम्ही नागरिक दक्ष , सुरक्षते कडे देऊ लक्ष
२)सुरक्षा नियमांचे पालन कराल जर, कायम आनंदी राहील तुमचे घर.
३)रहा सुरक्षित, ठेवा नियंत्रण, नका देऊ दुर्घटनेला आमंत्रण.
श्रीमती. संगीता आपटे, सोलापूर.
माहिती स्रोत – नेट
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र