देशात लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरु केली आहे. ‘इंडी’ आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्यातच भाजपात उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता असून, पहिल्या यादीमध्ये १०० जणांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.
गुरुवारी रात्री भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. रात्री उशिरा सुरु झालेली ही बैठक तब्बल तीन ते चार तास म्हणजेच साडे तीन वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत काही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध राज्यातील उमेदवारांविषयी चर्चा करण्यात आली आहे.
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान,गोवा, उत्तराखंड, गुजरात, आसाम, झारखंड राज्यांमधील उमेदवारांविषयी चर्चा करण्यात आली आहे. ईशान्येकडील राज्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आलेली नाही. या बैठकीत महाराष्ट राज्यातील उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आलेली नाही. केंद्रीय निवडणूक समितीमध्ये देखील समावेश आहे. त्यामुळे आणि महाराष्ट्रातील भाजपाचे नेते असल्यामुळे देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित होते. पहिल्या १०० जणांच्या यादीत नितीन गडकरींचे नाव असणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.