मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केल्यामुळे करुणा शर्मा हे चर्चेत आल्या होत्या. परळीमध्ये वैद्यनाथ मंदिराच्या समोर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. करुणा शर्मा यांच्यावर असलेले ॲट्रॉसिटीचा गुन्हा औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. आपल्यावरील ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा यासाठी करुणा शर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी पार पडली. त्यानंतर खंडपीठाने करुणा शर्मा यांना दिलासा दिला आहे.
२०२१ मध्ये करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. करुणा शर्मा या परळीत येणार होत्या. परळीत आल्यावर करुणा शर्मा या वैद्यनाथ दर्शनासाठी निघाल्या होत्या. मात्र त्याआधीच त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. त्यानंतर करुणा शर्मा आणि त्यांचा ड्रायव्हर यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
परळीत गेलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर करुणा शर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने करुणा शर्मा यांना दिलासा दिला आहे.