महादेव ॲप प्रकरणात ईडीने दिल्ली,मुंबई, कोलकत्ता आणि छत्तीसगड आणि अन्य १६ ठिकाणी धाड टाकली आहे. महादेव ॲप प्रकरण हे एक हाय प्रोफाइल घोटाळा आहे. यामध्ये एक ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. जे पोकर, पत्ते गेम, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आणि क्रिकेट यांसारख्या विविध खेळांवर बेकायदेशीर जुगार खेळण्यास प्रवृत्त केले. त्यातच आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ईडीने महादेव ऑनलाइन बुक सट्टेबाजी ॲप प्रकरणाशी ५८० कोटींपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता जप्त केली आहे. हे प्रकरण दुबईमधून चालवले जात होते.
ईडीने कोलकाता, गुरुग्राम, दिल्ली, इंदूर, मुंबई आणि रायपूर येथे महादेव ऑनलाइन बुकशी संबंधित मनी लाँड्रिंग नेटवर्कशी संबंधित असलेल्या संशयित व्यक्तींना लक्ष्य करत १५ ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान, ईडी म्हणाली की, आम्ही 1.86 कोटी रुपयांची रोकड, 1.78 कोटी रुपयांची मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच एकूण 580.78 कोटी इतकी रक्कम आम्ही गोठवली आहे.
दोन दिवसांपूर्वी देखील ईडीची कारवाई
तथापि, दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या ईडीच्या शोधमोहिमेत वायकॉम १८ नेटवर्कने महाराष्ट्र सायबर युनिटकडे दाखल केलेल्या तक्रारीशी जोडलेले आहेत. की ॲप बेकायदेशीरपणे इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्लॅटफॉर्मवर प्रसारित करत होता आणि त्यावर बेट लावले होते. ऑक्टोबर 2023 मध्ये, महाराष्ट्र सायबर युनिटने या प्रकरणासंदर्भात रॅपर गायक बादशाहची चौकशी केली.
तपास संस्थेने या प्रकरणातील नवव्या आरोपीला अटक केली आहे. नितीश दिवाण, जो महादेव ॲप प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांचा जवळचा सहकारी असल्याचे सांगितले जाते, त्यांना १५ फेब्रुवारी रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत अटक करण्यात आली होती. ते २०२२ मधील अबू धाबीच्या यास बेटावर आयफा चित्रपट महोत्सवाचे आयोजक होते. महादेव ॲप घोटाळा प्रकरणात व्यवहार करण्यासाठी देशशभरात तब्बल १,६०० नवीन बँक खाती तयार करण्यात आल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली होती. या बँक अकाऊंटमधून ऑनलाईन बेटिंगच्या माध्यमातून तब्बल ५ हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. यातील मुख्य आरोपीला