माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर कायम कोणत्या कोणत्या विषयामुळे चर्चेत असतो. मात्र आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीर यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा गंभीरने केली आहे. गौतम गंभीरने एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. गौतम गंभीरने मला राजकारणातून मुक्त करावे अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे केली आहे. राजकीय कर्तव्यातून मुक्त झाल्यानंतर मी क्रिकेटकडे लक्ष देईन, असे गंभीर म्हणाला.
लोकसभा निवडणुकीआधीच गंभीरचा राजकीय संन्यास
देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता आहे. मात्र निवडणुकीआधीच गौतम गंभीरने राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करायचे असल्याने गौतम गंभीरने घोषणा केली आहे. तसेच राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची मागणी गंभीरने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. गौतम गंभीर पूर्व दिल्लीमधून भाजपाचे खासदार आहेत. भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असतानाच गौतम गंभीरने ट्विट करत राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. २०१९ मध्ये गौतम गंभीरने पूर्व दिल्लीमधून लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला होता.
https://twitter.com/GautamGambhir/status/1763785102268772777
देशात लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरु केली आहे. ‘इंडी’ आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्यातच भाजपात उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता असून, पहिल्या यादीमध्ये १०० जणांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.