बेंगळुरूच्या व्हाईटफिल्डमधील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात चार लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटानंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली होती. बेंगळुरूच्या राजाजीनगर येथील कॅफेच्या व्हाईटफिल्ड शाखेत दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर पोलीस दल आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तिथे मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र कालच्या स्फोटाबाबत एक माहिती समोर आली आहे.
बेंगळुरूच्या व्हाईटफिल्डमधील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट झाला. त्यात १० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील एफ सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात एक संशयित एक व्यक्ती टोपी आणि मास्क घातलेला एक व्यक्ती हातात स्फोटके असलेली बॅग घेऊन कॅफेमध्ये येताना दिसत आहे. त्यानंतर त्याने कॅफेत रवा इडली ऑर्डर केली, त्यानंतर सोबत आणलेली बॅग तिथेच ठेवून तो निघून गेल्याचे दिसून येत आहे.
रामेश्वरम कॅफे हा बंगळुरूमधील एक प्रसिद्ध कॅफे आहे. हा कॅफे वाइटफिल्डच्या ब्रुकफिल्ड परिसरात आहे. हे बंगळुरू शहरातील टेक हब आणि बिझनेस सेंटर आहे. दरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा देखील शोध आणि तपास पोलीस करत आहेत. तसेच हा संशयित व्यक्ती शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच रामेश्वरम कॅफे हे लोकप्रिय हँगआउट्सपैकी एक आहे आणि सहसा दुपारच्या जेवणाच्या वेळेस तेथे खूप गर्दी असते. तर आता या कॅफेत झालेल्या स्फोटानंतर तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सध्या या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.