पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उदघाटन करण्यात आले होते. त्यानंतर थोड्या थोड्या कालावधीने कामे पूर्ण होतील तशी पुढील नवे मार्ग सुरु करण्यात आले. मात्र गेले अनेक दिवस रुबी हॉल ते रामवाडी हा मार्ग सुरु करण्यात आला नव्हता. काम पूर्ण झाले असले तरी अनेक कारणांमुळे या मार्गिकेचे लोकार्पण रखडले होते. काम पूर्ण झाले आहे तरी मार्गिका का सुरु केली जात नाहीये असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आता ६ मार्च रोजी मेट्रोच्या नव्या मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे.
रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन माध्यमातून या नवीन मार्गिकेचे लोकार्पण करणार आहेत. रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे अंतर हे साडेपाच किलोमीटर इतके आहे. अनेक दिवसांपासून याचे काम पूर्ण झाले नव्हते. तरीही याच्या उद्घटनाला मुहूर्त लागला नव्हता. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून ६ मार्च ही तारीख मिळाल्याने आता मेट्रो धावण्यास सज्ज झाली आहे. तसेच मेट्रोचा हा टप्पा सुरु झाल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीमधून दिलासा मिळणार आहे.
रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचे अंतर हे साडे पाच किलोमीटर इतके आहे. साडेपाच किलोमीटरच्या या मार्गामध्ये बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी अशी चार स्थानके आहेत. हा मार्ग सुरु झाल्यामुळे पुणे मेट्रोचे मेट्रो १४ चे काम पुणे होणार आहे. तसेच आता वनाझ ते रामवाडी असा मार्ग सुरु झाल्याने नागरिकांना प्रवास सोपा होणार असून, वाहतूक कोंडीपासून देखील सुटका मिळणार आहे.